रोहित कणसे
दारूचा खंबा म्हणजेच ७५० एमएलची पूर्ण बॉटल असते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की यामध्ये एक लिटर दारू का नसते?
दारूची संपूर्ण बॉटल १ लिटर, हाफ बॉटल अर्धा लिटर आणि क्वाटर २५०ml का नसते, याबद्दल आपण आज जाणून घेणारोत.
अमेरिकेसह जगभरातील अनेक देशात दारूची पूर्ण बॉटल एक लीटरची असते पण भारतात ती ७५० एमएलची असते.
सुरुवातीला वाइन फक्त बॅरलमध्ये ठेवली जात असे पण १८व्या शतकात काचेची किंमत पूर्वीपेक्षा खूपच कमी झाली.
प्रत्येक घरात एक काचेच्या वस्तु येऊ लागल्याने मद्य साठवण्यासाठी काचेच्या बाटल्या वापरणे सुरू झाले.
पण त्या काळी बाटल्या बनवण्यासाठी ग्लास ब्लोइंक ही पद्धत वापरली जात असे.
या पद्धतीत पोकळ धातूच्या पाईपचे टोक वितळलेल्या गरम काचेत घालून गरम काच पाइपभोवती गुंडाळल्यानंतर त्यात तोंडाने हवा फुंकून आकार दिला जात असे.
पण एका व्यक्तीच्या क्षमतेनुसार संपूर्ण एका श्वासात जास्तीत जास्त ७५० एमएल साइजची बॉटल तयार होऊ शकत असे.
त्यामुळे ७५० एमएलची काचेची बॉटल हेच स्टँडर्ज साईज मानले गेले आणि आतापर्यंत तीच साइज वापरली जाते.
दारूची फुल बाटली ७५० मिली असण्यामागे आणखी एक कारण पेगशी जोडले गेलेले आहे.
दारूच्या पेगचा हिशोब ठेवण्यासाठी ७५० मिली हे एक आदर्श प्रमाण आहे. दारूच्या स्मॉल पेगचा आकार ३० मिली आणि लार्ज पेगचा आकार ६० मिली असते, म्हणजेच बाटलीतील दारूचे प्रमाणही या मोठ्या आणि लहान पेगच्या पटीत आहे.
उदाहरणार्थ, एका पौवामध्ये (१८० मिली) तीन लार्ज किंवा ६ स्मॉल पेग बनवता येतात. त्याचप्रमाणे, दारूच्या पूर्ण बाटलीमध्ये (७५० मिली), १२ लार्ज आणि एक स्मॉल पेग किंवा २५ स्मॉल पेग बनवता येतात.
छत्रपती शिवरायांनी तिरूपती मंदिरात चालवलं होतं अन्नछत्र; मंजूर केली होती इतकी रक्कम