सकाळ वृत्तसेवा
एक अशी सामान्य वस्तू जी कधीच विमानामध्ये नेऊ दिली जात नाही
विमान प्रवासामध्ये ताप मोजण्याचं थर्मामीटर नेता येत नाही
त्याचं कारण आहे पारा. पारा विमानातून नेणं निषिद्ध आहे
थर्मामीटरमध्ये जो पारा असतो तो द्रव स्वरुपातला एक धातू आहे
हा पारा जर अॅल्युमिनिअममध्ये मिसळला तर तो अॅल्युमिनिअर नष्ट करतो
आणि विमानाचे पार्ट्स अॅल्युमिनिअमचे असतात, त्यामुळे विमानाला धोका निर्माण होऊ शकतो
पारा जर विमानात पडला तर विमानाला अपघात होऊ शकतो, त्यामुळे पारा विमानात नेता येत नाही
तरीही कुणी पारा सोबत नेला तर त्याच्यावर कायमस्वरुपी हवाई प्रवासावर बंदी येऊ शकते
यासह तुरुंगवास आणि दंडदेखील होऊ शकतो. त्यामुळेच पारा विमानात नेता येत नाही