Payal Naik
मुकेश अंबानी यांची अँटिलीया ही इमारत जगातील सगळ्यात महागडं घर असल्याचं सांगितलं जातं. ही इमारत बांधण्यासाठी 2 बिलियन डॉलरचा खर्च आला होता.
आज याची किंमत 4.6 बिलियन डॉलर आहे. या अलिशान घरात २७ मजले, जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, मंदिर, आरोग्य सुविधा, 168 कारची पार्किंग आणि 10 लिफ्ट्स आहेत.
जेव्हा अंबानी कुटुंब 2012 मध्ये अॅन्टिलिया मध्ये रहायला आले. तेव्हा त्या घराची किंमत ही जवळपास 15 हजार कोटींपेक्षा जास्त होती.
हे घर मुळात २७ मजल्यांचं आहे.त्यात मुलशी अंबानी आणि नीता अंबानी २६ व्या मजल्यावर राहतात.
तर त्यांची मुलं २५ ते २० या मजल्यांवर राहतात. इथे प्रत्येकासाठी वेगळा मजला आहे.
मात्र मुकेश आणि नीता अंबानी २६ व्या मजल्यावर का राहतात यालाही कारण आहे.
आपल्या खोलीत पूर्ण वेळ सूर्यप्रकाश राहावा आणि वातावरण हवेशीर राहावं यासाठी नीता यांनी हा निर्णय घेतला होता.
२६ व्या मजल्यावर जवळच्या लोकांनाच जाण्याची परवानगी आहे.
अंबानींच्या 'अँटिलीया'च्या जागेवर आधी काय होतं माहितीये?