कार्तिक पुजारी
सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
इस्लामिक कॅलेंडरमध्ये ईद-मिलाद-ऊन-नबी हा दिवस पैंगबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
याच दिवशी अल्लाने पैंगबर यांना पृथ्वीवर पाठवलं होतं असं मानलं जातं.
इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रबी-उल-अवलमध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव आहे.
याला ईद सारखंच पवित्र मानलं जातं. इस्लाममध्ये हा देखील अत्यंत महत्त्वाचा सण आहे.
या दिवशी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव एकत्र येतात आणि जुलूस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.