आशुतोष मसगौंडे
जेव्हा जेव्हा सौंदर्याचा उल्लेख केला जातो, तेव्हा तेव्हा पाकिस्तानी महिलांचे नाव अवर्जून घ्यावे लागते.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच असा विचार येत असणार की, पाकीस्तानी महिला इतक्या सुंदर का असतात?
पाकिस्तानी महिला त्वचेसाठी मुख्यतः घरगुती उपायांचा अवलंब करतात. यासह निरोगी आहारामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त चमक दिसून येते.
पाकिस्तानमध्ये लसूण मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. लसणात एन्टी एजिंग गुणधर्म असतात, जे चेहरा दीर्घकाळ तरूण ठेवण्यास मदत करतात.
पार्लरमध्ये जाण्याऐवजी पाकिस्तानी महिला मधापासून तयार केलेले फेस पॅक वापरतात. यामुळे त्वचा चमकदार दिसू लागते.
तिथल्या महिला रोज टोमॅटो आणि लिंबाचा रस त्वचेवर लावतात. यामुळे चेहरा गोरा होतो तसेच चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
पाकिस्तानी महिलांच्या आहारात डाळी, ग्रील्ड चिकन आणि मासे असतात. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसत नाही.
पाकिस्तानी महिला सौंदर्यासाठी बेसनाच्या पिठात हळद आणि दही मिसळून चेहऱ्यावर लावतात. त्यामुळे त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्याही पडत नाहीत.