अनिरुद्ध संकपाळ
भारताच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साई प्रणीथने आज एक मोठा धक्का दिला.
मुळचा हैदराबादचा असलेल्या साई प्रणीथने अवघ्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून निवृत्ती घेतली.
साई प्रणीथने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र तो गेल्या काही दिवसांपासून दुखापतीने त्रस्त होता.
त्यानंतर आज त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपण निवृत्त होत असल्याचं सांगितलं. निवृत्तीसोबतच त्याने आपला फ्युचर प्लॅन देखील सांगितला.
निवृत्तीनंतर प्रणीथ हा अमेरिकेतील ट्रायंगल बॅडमिंटन अकॅडमीत प्रमुख प्रशिक्षक म्हणून रूजू होणार आहे.
एप्रिल महिन्यात साई रवाना होणार असून तो सविस्त माहिती तिथं गेल्यावरच सांगणार आहे.