म्हणून, नलिनी सराफ झाल्या सीमा सराफ

kimaya narayan

मराठी इंडस्ट्रीमधील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे सीमा देव. २ ० २ ३ मध्ये सीमा यांचं निधन झालं.

सिनेविश्वात सीमा या अपघातानेच आल्या. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी सिनेमात काम करणं सुरु केलं.

पण तुम्हाला माहितीये का ? सीमा हे त्यांचं स्क्रीन नेम असून त्यांचं खरं नाव नलिनी सराफ असं होतं. लग्नानंतर ते रमा देव असं झालं.

आलिया भोगासी या सिनेमात त्यांनी सहकलाकाराची भूमिका केली. यावेळी त्यांचं नाव बदलण्यात आलं.

नलिनी यांनी जेव्हा सिनेविश्वात काम केलं तेव्हा सिनेविश्वात नलिनी जयवंत नावाच्या अभिनेत्री होत्या. या दोघींच्या नावाचा गैरसमज होऊ नये म्हणून त्यांना नाव बदलण्यास सांगण्यात आलं.

नलिनी यांना एका ज्योतिषाने त्यांच्यासाठी स हे अक्षर लकी असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळेस नूतन यांचा सीमा हा सिनेमा खूप गाजला होता.

यावरून त्यांच्या भावाने तू सीमा हे नाव ठेव असा सल्ला दिला. त्यावरून त्यांचं स्क्रीन नेम सीमा असं झालं.

मुंज्या सिनेमातील बालकलाकार आता काय करतो ? - येथे क्लिक करा