Swadesh Ghanekar
शिखरने वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक स्पर्धेतील २९ सामन्यांत १७७२ धावा चोपल्या आहेत. यात ८ शतकं व ७ अर्धशतकांचा समावेश आहे.
२००४च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत शिखर हे नाव उदयास आले. त्याने ३ शतकांसह ५०५ धावा केल्या होत्या.
शिखर धवनने २०१० मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयसीसी स्पर्धेतील स्टार अशी त्याची ओळख आहे.
शिखरने १६७ वन डे सामन्यांत ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आणि त्यात १७ शतकं व ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
३४ कसोटी सामन्यांत त्याच्या नावावर ७ शतकं व ५ अर्धशतकांसह २३१५ धावा आहेत. ६८ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने १७५९ धावा केल्या आहेत.
शिखरने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २२२ सामन्यांत २ शतकं व ५१ अर्धशतकांसह ६७६९ धावा केल्या आहेत.
दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखरला पुनरागमनाची संधीच मिळणारी नव्हती. सलामीच्या जागेसाठी युवा खेळाडूंची फौज तयार आहे.
शिखर संघाबाहेर गेल्यानंतर शुभमन गिलने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि तो संघाचा नियमित सदस्य झाला आहे.