Saisimran Ghashi
आपण लहानपणापासून ऐकतो चहा प्यायल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये. तर त्याच कारण आज जाणून घेऊया.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. यामुळे दात पिवळे होतात आणि दातांवर प्लाक जमा होते.
चहा प्यायल्यानंतर पाणी पिणे तुमच्या पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे अपचन, मळमळ आणि अतिसार होऊ शकतो.
चहा प्यायल्यानंतर थंड पाणी टाळा. यामुळे दातांवर भेगा निर्माण होऊ शकतात आणि दातांची संवेदनशीलता वाढू शकते. ते कमकुवत होतात.
चहामधील टॅनिन लोह शोषणात अडथळा आणू शकतात. चहानंतर काही वेळाने पाणी पिणे हे टॅनिन पातळ करते आणि लोहाचे शोषण सुधारण्यास मदत करते.
चहा प्यायल्यानंतर 30 मिनिटे ते 1 तासानंतर पाणी प्या.
आयुर्वेदानुसार, चहा प्यायल्यानंतर पाणी पिणे टाळावे कारण ते पचनशक्ती कमकुवत करते.
आता तुम्हाला माहित आहे चहा आणि पाण्याचा मेळ तुमच्या आरोग्यावर काय परिणाम करतो.
तुमच्या शरीरासाठी काय आवश्यक आहे ते लक्षात घ्या आणि त्यानुसार चहानंतर थंड पाणी पिणे टाळा.