Swadesh Ghanekar
प्रवास करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या खोडाला अनेकदा आपल्याला पांढरा रंग लावलेला दिसतो.
झाडाच्या खोडाला पडलेल्या चिरांमधून साल बाहेर येते व झाड दुर्बळ बनतं. त्यासाठी उत्तम उपाय शोधून काढला गेला.
पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा झाडांच्या बुंध्याशी संपर्क झाल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे झाड सुकून मरते.
उन्हाळ्यात झाडांच्या खोडाला पांढरा रंग लावल्याने उन्हापासून सुध्दा झाडांचे संरक्षण होते व मुळें सुध्दा रोगाला बळी पडत नाही. झाडे रंगवण्याचा हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे.
वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेली संरक्षित झाडे ओळखण्यासाठी सुद्धा झाडांना रंग दिला जातो. ज्या झाडांची काळजी स्थानिक प्रशासनाकडून घेतली जाते ती झाडे पांढऱ्या रंगाने रंगवली जातात
मोठ्या झाडांच्या खोडावरील भेगात विविध किडी घर करून असतात व झाडं पोखरतात. अशावेळी घट्ट पांढरा चुना लावल्याने त्या फटी भरून निघतात व किडीचा, बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो
रस्त्यावरील झाडे रात्री गाडी चालवताना ठळकपणे लक्षात यावीत म्हणून सुद्धा झाडे रंगवली जातात. त्यामुळे अपघात टळतो.
काही ठिकाणी झाडांच्या खोडाला निळा व लाल रंग ही वावरला जातो. पांढऱ्या रंगांमुळे कीड, बुरशी लगेच कळून येते.