आइनस्टाइनच्या मृत्यूनंतर मेंदूचे करण्यात आले 240 तुकडे.. काय आहे कारण?

अंकिता खाणे (Ankita Khane)

जगातील महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मेंदू जतन करण्यात आला होता.

अल्बर्ट आइनस्टाइन हे जगातील महान भौतिकशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षी बीजगणित आणि युक्लिडियन भूमिती शिकली.

सापेक्षतेच्या सिद्धांताद्वारे त्यांनी विश्वाचे नियम स्पष्ट केले. E=mc2 या सिद्धांताने विज्ञानाचे जग पूर्णपणे बदलून टाकले. आइनस्टाइन हे महान वैज्ञानिक तर होतेच पण ते तितकेच महान तत्वज्ञ देखील होते.

त्याची बुद्ध्यांक पातळी सर्वोत्तम होती. रिपोर्ट्सनुसार, त्याचा IQ जवळपास 160 होता. 130 पेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेल्या लोकांना श्रेष्ठ मानले जात होते, तर आइनस्टाइनचा IQ 160 होता. जे जगातील लोकसंख्येच्या केवळ 2.1 टक्के आहे.

जर्मन वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी झाला होता. वयाच्या ७६ व्या वर्षी १८ एप्रिल १९५५ रोजी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आइनस्टाइन मेंदू का जतन करण्यात आला?

अल्बर्ट आइनस्टाइन लहानपणापासूनच इतरांपेक्षा खूप वेगळे आणि कुशाग्र होते. त्याचे डोके जन्मापासूनच मोठे होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला तेव्हा प्रिन्स्टन विद्यापीठातील पॅथॉलॉजिस्ट डॉ. थॉमस स्टॉल्ट्स यांनी त्याचा मेंदू चोरला.

आपल्या मेंदूवर संशोधन होऊ शकते याची आइनस्टाइनला पूर्ण जाणीव होती, त्यामुळे त्यांनी त्यासाठी आधीच नकार दिला होता.

आपल्या शरीराच्या अवशेषांवर कोणताही अभ्यास करू नये, असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, तरीही कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय त्याचा मेंदू चोरीला गेला.

आइनस्टाइन यांच्या मेंदूचे 240 तुकडे

हॉस्पिटलने थॉमसला आइनस्टाइनचा मेंदू परत करण्यास सांगितले, थॉमसने त्याचा मेंदू परत केला नाही आणि तो जवळजवळ 20 वर्षे लपवून ठेवला. नंतर हार्वेने आइनस्टाइनचा मुलगा हॅन्स अल्बर्टकडून तो मेंदू आपल्याकडे ठेवण्याची परवानगी घेतली.

मात्र, त्याच्या मेंदूचा उपयोग विज्ञानाच्या हितासाठीच व्हायला हवा, अशी त्यामागची अट होती. त्यामुळे त्याच्या मेंदूचे 240 तुकडे करून सेलॉइडिन नावाच्या रसायनात टाकून तळघरात लपवण्यात आले.

त्याच्या मेंदूच्या अभ्यासात असे आढळून आले की त्यांचा मेंदू न्यूरॉन्स आणि ग्लियाच्या असामान्य गुणोत्तराने बनलेला होता. मात्र, अनेक अभ्यास करूनही त्यांचा मेंदू पूर्णपणे वाचू शकलेले नाही.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

येथे क्लिक करा