Saisimran Ghashi
हल्ली तरुण पिढीला आणि वयस्कर लोकांना देखील दारू आणि सिगरेटचे व्यसन लागत चालले आहे त्याचे कारण जाणून घेऊया.
सिगरेटमधील निकोटिन आपल्या मेंदूला एक प्रकारचा धक्का देतो, ज्यामुळे व्यसन निर्माण होते.
अनेकजण तणाव दूर करण्यासाठी दारू आणि सिगरेटकडे वळतात, परंतु हे फक्त तात्कालिक समाधान असते.
मित्रांच्या वर्तुळात दारू,सिगरेट पिताना पाहून किंवा चित्रपटांमध्ये सिगरेट पिताना दाखवून तरुणांवर सिगरेटचे व्यसन येण्याचे प्रमाण वाढते.
सिगरेटच्या विज्ञापनांमध्ये सिगरेट पिताना व्यक्ती दिसणे आकर्षक वाटते, पण त्यामागे लपलेले धोके दिसत नाहीत.
लहान वयातच कुतूहल किंवा प्रयोग म्हणून दारू आणि सिगरेट पितात आणि नकळत व्यसनी होतात.
काही जणांना वाटते की दारू आणि सिगरेट पिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.
डिप्रेशन, चिंता आणि इतर मानसिक आजारांमुळेही लोक सिगरेटकडे वळतात.
पार्टी, बार यासारख्या ठिकाणी दारू आणि सिगरेट पिताना पाहून लोक प्रेरित होतात.
सिगरेट आणि दारूमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांची माहिती नसल्यामुळे लोक दारू आणि सिगरेटचे व्यसन करत राहतात.