Anuradha Vipat
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याचा आज वाढदिवस आहे
प्रसादची पत्नी मंजिरी ओक हिने देखील त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मंजिरी ओक हिची ही खास बर्थडे पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
या पोस्टमध्ये तिने आपल्या पतीला अर्थात अभिनेता प्रसाद ओकला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये तिने प्रसादसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शन लिहिताना मंजिरीने लिहिलं की, ‘प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी गप्प बसेन, तुला बोलू देईन,मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते… तुला पर्याय नाही... ओह सॉरी सॉरी आज चांगलं बोलायचं असतं ना? ओके ओके, आय लव्ह यु. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो... वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!’
मंजिरी ओकच्या या पोस्टवर आता चाहते आणि इतर कलाकार मंडळींनी देखील भरभरून कमेंट्स केल्या आहेत. पत्नीच्या या पोस्टवर कमेंट करत प्रसाद ओकने तिला ‘आय लव्ह यु टू’ म्हटलं आहे.