Anuradha Vipat
‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं सिझन चांगलंच गाजलं आहे.
आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अरमान आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक यांना पायल मलिकच्या घटस्फोटाच्या निर्णयाविषयी माहिती देण्यात आली.
अरमान हा त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात आला होता. दिवसांतच पायल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.
पायलने नुकतंच घटस्फोटाविषयी वक्तव्य केलं होतं आता त्यावर अरमानने प्रतिक्रिया दिली आहे.
अरमान म्हणाला, मी आणि कृतिका बिग बॉसच्या घराबाहेर पडलो की सर्वांना आम्ही तिघं पुन्हा एकत्र आनंदाने राहत असल्याचं दिसू.
पुढे अरमानने सांगितलं, आमचं नातं हे प्रामाणिक आहे आणि त्यात कोणत्याही फसवणुकीला जागा नाही.
आता ‘बिग बॉस ओटीटी 3’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे