ऋषभ पंत CSK कडून खेळणार? 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

Pranali Kodre

ऋषभ पंत

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने नुकतीच २० ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Rishabh Pant | Sakal

कबाली पोझ

या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोमध्ये ऋषभने अभिनेते रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटातील सिग्नेचर पोझ दिल्याचे दिसत आहे.

Rishabh Pant | Sakal

थलायवा

पंतने त्याच्या फोटोच्या शेजारी तशाच पोजमधील रजनीकांत यांचा फोटोही जोडला आहे. या पोस्टला ऋषभने 'थलायवा' असं कॅप्शनही टाकले आहे.

Rajinikanth | Sakal

चर्चा

दरम्यान, त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Rishabh Pant | Sakal

धोनीशी संबंध?

अनेकांनी त्याच्या थलायवा या कॅप्शनचा संबंध चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीशी जोडला आहे. धोनीलाही क्रिकेटमधील थलायवा म्हटले जाते.

Rishabh Pant - MS Dhoni | Sakal

चर्चांना उधाण

त्यामुळे अनेकांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे की ऋषभ पंत पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघात येणार आहे का?

Rishabh Pant - MS Dhoni | Sakal

दिल्ली कॅपिटल्स

दरम्यान, ऋषभ पंत गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून तो या संघाचा कर्णधारही आहे. त्यामुळे अद्याप त्याला ते संघातून मुक्त करणार आहेत की कायम करणार आहेत, याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.

Rishabh Pant | X/IPL

कॉलनीतील पोरगी अन् ७ वर्षांचं अफेअर; अभिजीत सावंतची लव्हस्टोरी

Abhijeet Sawant with Wife Shilpa | Instagram
येथे क्लिक करा