Anuradha Vipat
श्वेता तिवारीचं पहिलं लग्न वयाच्या 18 व्या वर्षी झालं होतं. पण तिचं ते लग्न मोडलं.
त्यानंतर श्वेताने दुसरं लग्न केलं जे फार काळ टिकू शकलं नाही.
आता नुकतीचं श्वेताने एक मुलाखती दिली होती त्यामध्ये तिला दोन घटस्फोटानंतर ती आता तिसरं लग्न कधी करणार असा खोचक प्रश्न अनेकदा तिला विचारला जातो यावर तुझं मत काय असं विचारलं गेलं.
त्यावर श्वेता म्हणाली की, मला तिसरं लग्न नको करु असं सांगणारे हे लोक कोण आहेत? हे माझं आयुष्य आहे आणि त्याचा निर्णयही मीच घेणार.
पुढे श्वेताने म्हटलं की, तुम्ही अगदी 10 वर्ष लिव्हइनमध्ये राहून तुमच्या पार्टनरला सोडलं तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण हेच तुम्ही लग्नाच्या दोन वर्षातच घटस्फोट घेतला तर तुम्हाला लोकं लगेच प्रश्न विचारतात.
पुढे श्वेताने म्हटलं की, मला अनेकांकडून तिसरं लग्न करुन नकोस असा सल्ला देखील दिला जातो.
अभिनेत्री श्वेता तिच्या फिटनेस आणि लूक्समुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असते