Anuradha Vipat
बिग बॉस मराठी’चा बहुप्रतिक्षीत पाचवा सीझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात सहभागी होतील असं बोललं जात होतं.
आता या सगळ्यावर आता वर्षा उसगांवकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
वर्षा उसगांवकर मुलाखतीत म्हणाल्या, “मी बिग बॉसच्या घरात सहभाग होत नाहीये. ही कल्पना कोणाच्या डोक्यातून आली याबाबत मला काहीच माहिती नाही. या सगळ्या अफवा आहेत.
पुढे वर्षा उसगांवकर मुलाखतीत म्हणाल्या, येत्या काळात मी केलेल्या दोन ओटीटी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतील. तसेच मी आता चित्रपटांकडे वळणार आहे.
हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करण्यास मी उत्सुक आहे असंही पुढे वर्षा उसगांवकर मुलाखतीत म्हणाल्या
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका नुकतीच वर्षा उसगांवकर यांनी सोडली आहे