Anuradha Vipat
भारतीय संघातील स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत कायमच चर्चेत राहिला आहे.
ऋषभचे नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडले जात आहे. आता उर्वशीने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकताच एका मुलाखतीमध्ये उर्वशीला ऋषभबाबत प्रश्न विचारण्याच आला होता.
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने थेट उर्वशीच्या पोस्टवरील कमेंट वाचून दाखवण्यास सुरुवात केली होती.
‘ऋषभला तू कधीही विसरु नकोस. तो तुझा आदर करतो. जर तुमचं लग्न झालं तर आम्हाला आनंद होईल…’ असे चाहता म्हणाला होता.
त्यावर 'नो कमेट… म्हणजे यावर मला काहीही बोलायचे नाही…’ असे उर्वशी म्हणाली आहे.