सकाळ डिजिटल टीम
विम्बल्डन २०२४ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने मिळवले. त्याने अंतिम सामन्यात दिग्गज नोव्हाक जोकोविचला पराभूत केले.
स्पेनच्या अल्काराजने सातवेळच्या विम्बल्डन विजेत्या जोकोविचला अंतिम सामन्यात ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले.
विम्बल्डन २०२४च्या अंतिम सामन्यात शनिवारी बार्बोरा क्रेयचीकोव्हाने बाजी मारली आणि झेक प्रजासत्ताककडून ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती पाचवी खेळाडू ठरली.
२८ वर्षीय बार्बोराने इटलीच्या जास्मीन पाओलिनीचा ६-२,२-६,६-४ असा पराभव केला. २०१७ नंतर विम्बल्डनमध्ये महिला एकेरीत ७ वेगवेगळ्या चॅम्पियन ठरल्या आहेत आणि त्यात बार्बोराचं नाव समावेश झालं आहे.
बार्बोरा क्रेयचीकोव्हा हिने १९९८ च्या विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱ्या याना नोव्होत्नाकडून प्रशिक्षण घेतले. यानाचे कॅन्सरमुळे काही वर्षांमुळे निधन झाले.
विम्बल्डन स्पर्धा संपल्यानंतर पुरुष व महिला एकेरीतील विजेता कार्लोस अल्कराज आणि महिला एकेरीची विजेती बार्बोरा क्रेयचीकोव्हा यांनी पार्टीत भारी डान्स केला.
झेक प्रजासत्ताकच्या दक्षिण भागातील Brno येथे १८ डिसेंबर १९९५ मध्ये बार्बोराचा जन्म झाला. सहाव्या वर्षी तिने टेनिस खेळण्यास सुरूवात केली.
अल्काराजचे हे एकूण चौथे ग्रँडस्लॅम, तर दुसरे विम्बल्डन विजेतेपद आहे. अल्काराजने यापूर्वी अमेरिका ओपन २०२२ आणि फ्रेंच ओपन २०२४ या ग्रँडस्लॅम स्पर्धांचेही विजेतेपद जिंकले आहे.