सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंडीमध्ये अनेकांना अंथरुणात लोळत राहावेसे वाटते.
हिवाळा शरीर वाढीसाठी योग्य काळ मानला जातो. या काळात केलेल्या व्यायामामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते.
आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात आहार आणि व्यायामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
जर तुम्हाला रोज जिममध्ये जाणे शक्य नसेल तर, तुम्ही घरी राहून काही व्यायाम आणि योगासनं करू शकता.
या तीन आसनांमुळे शरीर उबदार आणि फीट राहण्यास मदत होईल.
पदहस्तासन हे योगासन केल्याने हृदय मजबूत होते आणि हृदयात रक्ताचा प्रवाह व्यवस्थित राहतो. यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासोबतच पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास आणि उंची वाढवण्यास मदत करते.
अधोमुख श्वानासन हे योगासन केल्याने पोटाच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत आणि टोन्ड होतात. तसेच पाठीचा कणाही मजबूत राहतो. या आसनामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण सुधारते. यकृत आणि किडनीशी संबंधित आजारही बरे होतात.
चक्रासन हे योगासन केल्याने वजन नेहमी नियंत्रणात राहते. तसेच शरीर लवचिक राहते. हे आसन टाइप 2 मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पाठीचा कणा सरळ राहतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.