राहुल शेळके
देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांचे दोन मुलं रिशाद आणि तारिक यांना सुमारे 500 कोटी रुपयांचे शेअर्स गिफ्ट दिले आहेत.
22 जानेवारी 2024 च्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांना 51,15,090 इक्विटी शेअर्स गिफ्ट दिले आहेत.
विप्रो एंटरप्रायझेसचे संचालक तारिक प्रेमजी यांना तितकेच शेअर्स 51,15,090 इक्विटी शेअर्स गिफ्ट दिले आहेत.
झीम प्रेमजींनी त्यांच्या दोन मुलांना एकूण 1,02,30,180 शेअर्स गिफ्ट केले आहेत.
अझीम प्रेमजींनी त्यांच्या दोन मुलांना भेट दिलेले शेअर्स एकूण इक्विटीच्या 0.2% आहेत.
या व्यवहारानंतर, अझीम प्रेमजी यांची कंपनीतील हिस्सेदारी 4.3% असेल, तर ऋषद प्रेमजी आणि तारिक प्रेमजी यांची हिस्सेदारी 0.13% असेल.
अझीम प्रेमजींनी त्यांच्या दोन्ही मुलांना भेट दिलेल्या 1,02,30,180 (एक कोटीहून अधिक) शेअर्सचे एकूण मूल्य 489 कोटी रुपये आहे.
गुरुवारी कंपनीचे शेअर्स घसरले आणि ते 475 रुपयांच्या खाली व्यवहार करत होते.
या वर्षी 15 जानेवारी रोजी शेअरची किंमत 526.45 रुपयांवर पोहोचली. हा शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.