Travel : कुटुंबासह भेट द्या 'या' ठिकाणी; तेही कमी बजेटमध्ये

सकाळ डिजिटल टीम

उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या सुरु होत आहेत. त्यामुळे या कालावधीत अनेकांनी कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा प्लॅन केला असेल.

या चार दिवसांच्या सुट्टीसाठी तुम्ही अजूनही प्लॅन केला नसेल तर कमी बजेटमध्ये तुम्ही कुटुंबासोबत या काही खास ठिकाणी भेट देऊ शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही कुटुंबासोबत कमी खर्चात सहलीचा आनंद घेऊ शकता.

गोव्याच्या अनेक किनाऱ्यांवर तुम्ही कुटुंबासह एंजॉय करु शकता. कमी खर्चातील ही सहल तुमच्या नेहमी लक्षात राहू शकते.

कोकणातील अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. महाराष्ट्राचं सौंदर्य खुलवणारं आणि पर्यटकांना भुरळ घालणारं एकमेव ठिकाण म्हणून याकड पाहिल जात.

हरिद्वारमध्ये तुम्ही हर की पौरी स्नानासोबत मनसा देवी मंदिर आणि लक्ष्मण झुलाला भेट देऊ शकता. ऋषिकेशसह या प्रदेशातील काही ठिकाणांना भेट देताना खर्चही कमी येईल.

संपूर्ण कुटुंबासह तुम्ही दार्जिलिंगमध्ये टॉय ट्रेनमधून फेरफटका मारू शकता. आणि तेथील काही पर्यटन स्थळांनाही भेट देऊ शकता.

कमी खर्चात कुटुंबासोबत सहल करायची असेल तर मनाली हे ठिकाणी तुमच्यासाठी बेस्ट आहे. मनालीमध्ये निसर्गाचा आनंद तुम्ही खूप जवळून अनुभवू शकता.

तामिळनाडूमध्ये असलेलं उटी या शहराला त्याच्या सौंदर्याने नटल्यामुळे डोंगराची राणी म्हटले जाते. कुटुंबासह भेट देण्यास हे ठिकाण योग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.