कार्तिक पुजारी
एका महिला कर्मचाऱ्याने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील मोठी कंपनी ऑरेंज विरोधात खटला दाखल केला आहे. महिलेचा दावा आहे की, कंपनीने तब्बल २० वर्षे तिला कोणतेही काम करायला न देता पूर्ण पगार दिला आहे.
लॉरेन्स व्हॅन वासेनहोव्ह या फ्रेंच महिलेने दावा केलाय की, १९९३ मध्ये तिला ऑरेंज कंपनीने कामावर घेतले होते. पण काही काळाने तिला पॅरालायसिस झाला.
सुरुवातीला कंपनीच्या तिच्या क्षमतेनुसार तिला काम देण्यास सुरुवात केली. शिवाय कंपनीमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या.
पण,लॉरेन्सने फ्रान्समध्येच इतर ठिकाणी ट्रान्सफर मागितला, तो कंपनीने मंजूर केला. २००२ मध्ये लॉरेन्सचे ट्रान्सफर करण्यात आले. नव्या ठिकाणी तिला काम करण्यासाठीच्या सुविधा देण्यात आल्या नव्हता.
कंपनीला तिच्या क्षमतेनुसार काम देण्याऐवजी तिला काम देणेच पूर्णपणे बंद केले. याकाळात तिला पूर्ण पगार मिळत होता.
तब्बल २० वर्षे तिला पगार दिला जात होता. त्यानंतर मात्र लॉरेन्सने कंपनीविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला.
लॉरेन्सचे म्हणणे आहे की, कोणतेही काम दिले गेले नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी तिची कुचंबणा होत होती. तिला नैतिक अत्याचार झाल्याचं वाटत होतं.