Pranali Kodre
भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात 16 जूनपासून वनडे मालिका सुरू झाली.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 143 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
भारताच्या विजयात स्मृती मानधनाने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
तिने 127 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकारासह 117 धावांची शानदार शतकी खेळी केली.
ही खेळी करताना तिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 7000 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला. स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारी जगातील सहावी, तर भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 16 जून 2024 पर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या 6 क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या मिताली राजच्या नावावर आहे. तिने 10868 धावा केल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची शारलोट एडवर्ड्स असून तिने 10273 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडकडून अजूनही सक्रिय क्रिकेट खेळत असलेली सुझी बेट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिने 9904 धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजची स्टिफानी टेलरही अद्याप सक्रिय क्रिकेटपटू असून तिने 8940 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंग या यादीत पाचव्या क्रमांकावर असून तिने 8352 धावा केल्या आहेत.
स्मृती मानधनाने 7059 केल्या आहेत.