Aishwarya Musale
प्रत्येकाला कुर्तीसोबत दुपट्टा घ्यायला आवडतो. कारण यामुळे लूक सुंदर दिसतो. दुपट्ट्याशिवाय कुर्ता सेट अपूर्ण वाटतो. तुम्ही तुमच्या सूटसोबत वेगवेगळ्या डिझाईन्सचे दुपट्टे स्टाइल करता. पण यावेळी नेट दुपट्टा ट्राय करून पाहा.
आजकाल नेट खूप ट्रेंडमध्ये आहे आणि त्यात अनेक चांगल्या डिझाईन्सही उपलब्ध आहेत. ते परिधान करून तुम्ही तुमचा लुक परफेक्ट बनवू शकता. तुम्ही कोणता दुपट्टा स्टाइल करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
जर तुम्ही प्लेन डिझाईनची कुर्ती घातली असेल तर त्यावर थ्रेड वर्क असलेला नेट दुपट्टा स्टाइल करू शकता. तुम्ही कोणत्याही कलरच्या थ्रेडने बनवलेला दुपट्टा घालू शकता.
बाजारातही तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. जे तुम्ही 200 ते 250 रुपयांना खरेदी करू शकता.
लूक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही एम्ब्रॉयडरी वर्कच्या दुपट्ट्याला कुर्तीसोबत स्टाइल करू शकता.
यामध्ये तुम्हाला स्टोन वर्क एम्ब्रॉयडरी, सिक्वेन्स वर्क, थ्रेड वर्क एम्ब्रॉयडरी असे पर्याय मिळतील. असे दुपट्टे तुम्हाला बाजारात स्वस्तात मिळतील.
तुम्ही सूटसोबत गोटा पट्टी वर्कचा दुपट्टाही घालू शकता.
तुम्हाला हवे असल्यास फॅब्रिक खरेदी करू शकता आणि गोटा घरी लावून दुपट्टा तयार करू शकता. तुमचा दुपट्टा 250 ते 300 रुपयांना तयार होईल.