Monika Lonkar –Kumbhar
वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होतात.
अनेकदा या बदलांमागे पोषकतत्वांची कमतरता ही असू शकते.
आहाराची नीट काळजी घेतली नाही, तर याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. त्यासाठी महिलांनी आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा? जाणून घेऊयात.
पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात कमी चरबीयुक्त दुधाचा समावेश करायला हवा.
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे, स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.
काही संशोधनानुसार, दह्याचे सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
निरोगी आरोग्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात विविध प्रकारच्या बेरीजचा समावेश करायला हवा.