सकाळ डिजिटल टीम
रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे (Mirya-Nagpur Highway) चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. सर्वात अवघड असलेल्या आंबा घाटामध्येही (Amba Ghat) मुर्शी सोडल्यानंतर तीन किमीच्या टप्प्यात डोंगरामध्ये खोदाई करण्यात आली आहे.
साखरपा येथून रस्ते खोदाई, पूल बांधकाम यासाठी डंपर, जेसीबी (JCB) दिसत आहे. महामार्गामध्ये आडवी येणारी भलीमोठी झाडे तोडण्यात आल्यामुळे निसर्गरम्य परिसर भकास दिसत आहे.
पावसाळ्यापूर्वी हे काम झाले नाही तर मात्र मोठी वाहनचालकांना कसरत करावी लागणार आहे....!
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आंबा घाटातील डोंगराची कटाई सुरू.
आंबा घाटात काँक्रिटीकरणासाठी खडीचा पहिला थर टाकण्यात आला आहे.
रस्त्याच्या बाजूची सुमारे वीस मीटरहून अधिक भाग खोदाई झाली आहे.
मुर्शी येथे डोंगर कापल्यामुळे रस्त्याच्या बाजूचा परिसर भकास दिसत आहे. (छाया : राजेश कळंबटे, रत्नागिरी)