Monika Lonkar –Kumbhar
आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे सायकल चालवण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले आहे.
सायकल चालवल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि आपले आरोग्य ही चांगले राहते.
आज जगभरात जागतिक सायकल दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.
नियमितपणे सायकल चालवल्यामुळे आपले शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते आणि स्नायू मजबूत राहतात.
सायकल चालवल्याने नैराश्य, चिंता आणि तणावाची समस्या दूर होण्यास मदत होते.
जर तुम्ही रोज किमान १ तास किंवा अर्धा तास जरी सायकल चालवली तरी महिन्याभरात तुमचे वजन कमी होऊ शकते.
नियमितपणे सायकल चालवल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.