Monika Lonkar –Kumbhar
जगभरात दरवर्षी ७ जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट खायला प्रचंड आवडते.
तुम्हाला माहित आहे का? की चॉकलेट खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आज आपण चॉकलेटचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊयात.
चॉकलेटमध्ये कॅफेनचा समावेश असतो. या कॅफेनमुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते.
चॉकलेटमध्ये समाविष्ट असणारे पोषकघटक शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
चॉकलेटचे सेवन केल्याने त्वचेची रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुधारते.
चॉकलेटचे सेवन केल्यामुळे आपला मूड देखील सुधारू शकतो.