पुजा बोनकिले
दरवर्षी 18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.
युनेस्कोने 1982 मध्ये याची सुरुवात केली होती.
या दिवसाचा मुख्य उद्देश जगातील महत्त्वाच्या स्मारके आणि स्थळांचे संवर्धन करणे हा आहे.
पुण्यातील काही खास ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकता.
आगा खान पॅलेस 1892 मध्ये सुलतान आगा खान- 3 याने बांधलेला महाल हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांसारख्या प्रसिद्ध नेत्यांना कैदी म्हणून ठेवले होते.
शनिवार वाडा पुण्यातील सुंदर वास्तुशिल्पकलेचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा पहिले बाजीराव पेशवे यांनी पेशव्यांच्या वास्तव्यासाठी बांधला होता. हा वाडा 625 एकरात हा वाडा उभारण्यात आला आहे.
सिंहगड किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला 49 किलोमीटरवर असलेले हे ठिकाण अंतर्ज्ञानाने प्रतिसाद देणारे आणि गुंतवून ठेवणारे आहे. किल्ल्याच्या सभोवताली सह्याद्री पर्वतरांगा असून हे ठिकाण नवीन साहसी कृत्यांसाठी प्रसिद्ध आहे.
पाताळेश्वर मंदिर हे पुण्यातील सर्वात जुने स्थळ आहे. जे आठव्या शतकामध्ये बांधले आहे. तोडफोडीमुळे गुंफेच्या आतील भागाचे नुकसान झाले आहे. पाताळेश्वर मंदिर हे भटकंतीसाठी योग्य ठिकाण आहे.