कार्तिक पुजारी
नेपाळचे शेर्पा कामी रिटा यांनी रविवारी सकाळी विक्रम केला आहे.
त्यांनी २९ वेळा जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. याआधी त्यांनी २८ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे.
कामी रिटा यांना एव्हरेस्ट मॅन म्हणून देखील ओळखलं जातं.
५४ वर्षीय शेर्पा आणि गाईड असलेल्या कामी रिटा यांनी मागच्या वसंत ऋतूमध्ये माऊंट एव्हरेस्ट दोन वेळा सर केलं होतं.
माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर आहे. तो जगातील सर्वात उंच शिखर आहे. माऊंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा म्हटलं जातं.
कामी रीटा हे नेपाळचे शेर्पा असून माऊंट एव्हरेस्ट २९ वेळा सर करणारे ते जगातील एकमेव व्यक्ती आहेत.