पुजा बोनकिले
दरवर्षी १० ऑगस्ट जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो.
सिंहाच्या संवर्धनासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मोठ्या प्रमाणात होणारी जंगल तोड, अवैध शिकारीमुळे सिहांची संख्या कमी होत आहे.
दिवसेंदिवस सिंहाची संख्या आता घटत चालली आहे.
वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर अॅनिमल्सच्या मते, सिंहाला जंगलचा राजा म्हटलं जातं.
पण सिंह पठारी आणि गवताळ प्रदेशात आढळतो.
सिंहाचे विविध प्रकार आहेत.
सिंह मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे.