पुजा बोनकिले
दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक हिवताप दिनानिमित्त या वर्षाचे घोषवाक्य ‘मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी’ असे ठरविले आहे.
मलेरिया झाल्यास शरीरात कोणते लक्षण दिसतात हे जाणून घेऊया.
थंडी वाजून ताप येतो.
ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो.
नंतर घाम येऊन अंग गार पडू शकते.
ताप आल्यानंतर डोके अतिशय दुखते.
बऱ्याचवेळा उलट्याही होतात.
औषधोपचार आरोग्य यंत्रणेच्या देखरेखी खाली देणे.