जगात किती महासागर आहेत? तुम्हाला माहितीय का?

Monika Lonkar –Kumbhar

महासागर

पृथ्वीचा ७० टक्क्यांहून अधिक भाग महासागरांनी व्यापलेला आहे. महासागर हा अन्नाचा प्रमुख स्त्रोत आणि जीवमंडलाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

जागतिक महासागर दिन

जगभरात दरवर्षी ८ जून हा दिवस 'जागतिक महासागर दिन' म्हणून साजरा केला जातो.

उद्देश

महासागरांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरुकता वाढवणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. जगात एकूण किती महासागर आहेत? चला जाणून घेऊयात.

पॅसिफिक महासागर

पॅसिफिक महासागर आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यामध्ये स्थित आहे. पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे, 

अटलांटिक महासागर

उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका यांच्यामध्ये स्थित आहे. हा जगातील दुसरा सर्वात मोठा महासागर आहे. 

हिंदी / भारतीय महासागर

हा महासागर आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि हिंद महासागर बेटांच्या दरम्यान स्थित असून हा जगातील तिसरा सर्वात मोठा महासागर आहे. 

दक्षिण महासागर

या महासागराला २००० मध्ये आंतरराष्ट्रीय हायड्रोग्राफिक संघटनेने अधिकृतपणे मान्यता दिली. हा महासागर अंटार्क्टिकाभोवती स्थित आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे २०.८ दशलक्ष चौरस किलोमीटर आहे.

आर्क्टिक महासागर

जगातील पाच महासागरांपैकी सर्वात लहान म्हणजे आर्क्टिक महासागर, जो उत्तर ध्रुवाभोवती आर्क्टिक प्रदेशात स्थित आहे आणि उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाने वेढलेला आहे.

मधुमेहींसाठी रामबाण आहे मंडूकासन, दररोज केल्याने मिळतील भरपूर फायदे

Benefits Of Mandukasana | esakal
येथे क्लिक करा.