पिझ्झा लव्हर्ससाठी 5 देसी स्टाइल पिझ्झा रेसिपीज...

Aishwarya Musale

पिझ्झा भारतीय पदार्थ नसला तरी हा इटालियन पदार्थ भारतीयांनी मनापासून स्वीकारला. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच पिझ्झा फार आवडतो.

त्यामुळे हल्ली बहुतेक घरांमध्ये कोणतीही पार्टी असो किंवा मुलांचा हट्ट महिन्यातून साधारण २-३ वेळा तरी पिझ्झा येतोच.

शिवाय काही लोक घरच्या घरी पिझ्झा बनवणंही पसंत करतात. त्यामुळे आता त्याला इंडियन टच आला आहे.

बटर चिकन पिझ्झा

क्रिमी बटर चिकन, पिझ्झा बेसवर पसरवून ओव्हनमध्ये बेक करून घ्या. बेक करण्याआधी त्यावर कांद्याचे लहान चौकोनी तुकडे, शिमला मिरचीचे तुकडे, ग्रेटेड चीजचा एक थर लावून घ्या आणि छान बेक करा. जर तुमच्याकडे पिझ्झा बेस नसेल तर हे तुम्ही ब्रेडवर पण करू शकता.

चिकन तंदूरी पिझ्झा

या पिझ्झासाठी मसालेदार, स्मोकी आणि काहीसे जळके तंदूरी चिकनचे पिसेस यावर टॉपिंग्ज म्हणून टाकावे. त्याआधी पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावावा. त्यावर हे चिकन पिसेस टाका. त्यावर पॅरमेसान चीज घाला. चीज वितळेपर्यंत बेक करा.

मटन खिमा पिझ्झा

पिझाबेसवर मसालेदार मटन खिमा टॉपिंग्ज म्हणून वापरू शकतात. बेसवर करी पसरवून छान बेक करून घ्या. यासाठी आदल्या दिवशीची उरलेली करी वापरली तर स्वाद अजून वाढतो.

पनीर मखनी पिझ्झा

पिझ्झामध्ये ही क्रिमी फ्लेवरची रेसिपी व्हेजिटेरीयन लोकांसाठी नवं आकर्षण आहे. पिझ्झा बेसवर एक्स्ट्रा बटर पनीर मखनीचा लेयर लावा. त्यावर कांदा, शिमला मिरचीचे टॉपिंग्ज लावा. नीट बेक करून घ्या.

ब्रेड पिझ्झा

जर दिवसभरात कधीही पिझ्झा खाण्याची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा इंस्टंट पिझ्झा आहे. जो ब्रेडच्या दोन स्लाइसने तुम्हाला बनवता येईल. या स्लाइसवर पिझ्झा सॉस पसरवा. त्यावर तुमच्याकडे उपलब्ध गोष्टींचे टॉपिंग्ज पसरवा. चीज घाला आणि तव्यावर नीट शेकून घ्या.

हिरवी की लाल.. आरोग्यासाठी कोणती मिरची फायदेशीर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा