युगंधर ताजणे
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठला ना कुठला तरी छंद हा असतोच. छंदाशिवाय जगणं त्याला अवघड जाते.
संदीप बोयत नावाच्या व्यक्तिला बॉलीवूड सेलिब्रेटींचे पोस्ट तिकीट जमवण्याचा छंद लागला. त्यामुळे त्यांनी त्यातून शेकडो तिकीटं जमा केली.
जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या छंदाविषयीच्या विविध आठवणींना उजाळा दिल्याचे दिसून आले आहे.
या टपाल तिकीटांमध्ये ६० ते ९० च्या दशकांतील बॉलीवूड सेलिब्रेटींची छबी त्या तिकीटांमधून दिसून येते.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातही टपालांचे महत्व टिकून आहे. त्याची महती लोकांना माहिती आहे.
पूर्वीच्या काळी एकमेकांची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी, निरोप पाठवण्यासाठी काही सरकारी कामांसाठी, नोकरीसाठी इत्यादी अनेक कामांसाठी टपालसेवेचा आधार घेतला जात होता.
आजकाल तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल झाले आहेत. मोबाईल आणि इंटरनेटमुळे तर माहितीचे जाळे अधिकच विस्तारले आहे.
5 जी च्या काळात आज ही टपालसेवेचे महत्व अबाधित आहे. हे सर्व सांगण्या मागचे कारण म्हणजे आज ‘जागतिक टपाल दिन’ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.