Sudesh
रोल्स रॉयस या कंपनीने काही दिवसांपूर्वीच जगातली सगळ्यात महागडी कार लाँच केली. अर्काडिया ड्रॉपटेल या कारची किंमत तब्बल 256.94 कोटी रुपये आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात महागडी गाडी ही रोल्स रॉयसची 'ला रोज नॉयर' ड्रॉपटेल ही आहे. याची किंमत 249.48 कोटी रुपये आहे.
रोल्स रॉयसची बोट-टेल ही गाडी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी कार आहे. याची किंमत 233.28 कोटी रुपये आहे.
बुगाटी कंपनीची 'ला व्हॉईचर नॉयर' ही कार या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. याची किंमत 155.80 कोटी रुपये आहे.
पगानी कंपनीची झोंडा HP बरचेट्टा नावाची कार या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. याची किंमत 146.64 कोटी रुपये आहे.
एसपी ऑटोमोटिव्ह कंपनीची केऑस ही गाडी जगातील सहावी सगळ्यात महागडी गाडी आहे. याची किंमत 119.98 कोटी रुपये आहे.
रोल्स रॉयस कंपनीची स्विपटेल ही गाडी या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. याची किंमत 108,31 कोटी रुपये आहे.
बुगाटीची सेंटोडिसी ही कार टॉप-10 लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. याची किंमत 74.98 कोटी रुपये आहे.
मर्सिडीज कंपनीची एक्सेलेरो ही कार जगातील नवव्या क्रमांकाची सर्वात महागडी गाडी आहे. याची किंमत 66.65 कोटी रुपये आहे.
पगानी कंपनीची हुयरा कोडालुंगा ही कार या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. याची किंमत 61.63 कोटी रुपये आहे.