सकाळ डिजिटल टीम
वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात 17 मार्च रोजी रंगणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केलेला असल्याने यंदा डब्ल्युपीएलला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.
या दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकला, तरी त्या संघाच्या फ्रँचायझीचे हे पहिले विजेतेपदही ठरणार आहे. कारण या दोन्ही संघांच्या फ्रँचायझीला अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेली नाही.
डब्ल्युपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीत 8 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आणि अंतिम सामन्यात थेट प्रवेश केला आहे.
डब्ल्युपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर साखळी फेरीत 8 पैकी 4 सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांनी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम सामना गाठला.
दरम्यान, आत्तापर्यंत डब्ल्युपीएलच्या दोन्ही हंगामात मिळून दिल्ली आणि बेंगलोर संघात चार सामने खेळवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या चारही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. आत्तापर्यंत एकदाही बेंगलोरला दिल्लीवर डब्ल्युपीएलमध्ये विजय मिळवता आलेला नाही.