अनिरुद्ध संकपाळ
बृजभूषण यांच्याविरूद्ध दिल्ली पोलीस एफआयआर दाखल करण्यासा टाळाटाळ करत असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने बंद केली आहे.
बृजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करत सात महिला कुस्तीपटूंनी सीलबंद प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मागणी करत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सांगितले की, याचिका एफआयआर दाखल व्हावी म्हणून करण्यात आली होती. आता एफआयआर दाखल झाली आहे.
आता न्यायासठी कुस्तीपटूंना खालच्या न्यायालयांचा पर्याय खुला आहे.
दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिलला बृजभूषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. ही याचिका गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.