Wrestler Ear : पैलवानांचे कान सुपारी घालून फोडतात का?

संतोष कानडे

पैलवान

पैलवानांचे झुबकेदार किंवा सुपारीसारखे कान तुम्ही बघितले असतली. कानात खरंच सुपारी घालून बुक्कीने कान फोडतात का?

Wrestler Ear

कुस्ती

किंवा कुस्तीच्या आखाड्यात त्यांचे कान तोडले जातात का? असे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात

Wrestler Ear

कुस्तीपटू

मात्र तसे अजिबात नाही. पैलवानाला चांगला कुस्तीपटू म्हणून तयार होण्यासाठी आखाड्यात खूप घाम गाळावा लागतो, खूप मेहनत करावी लागते.

Wrestler Ear

तापमान

ज्यावेळी पैलवान आखाड्यात सराव करतो किंवा लढतो, त्यावेळी त्याच्या शरीराचे तापमान वाढलेले असते. रक्ताभिसरणही वाढते. यावेळी प्रतिस्पर्ध्याच्या हाताचे आघात/ठोसे त्याच्या कानांवर पडून कान मऊ होतात.

Wrestler Ear

कान

ठोसे जास्त पडू लागले किंवा मान ओढताना कानाला हाताचा मार लागला तर कान फुटतो. त्याठिकाणी रक्त साकळून फुग येते. त्यालाच आपण कान फुटला, असे म्हणतो.

Wrestler Ear

इंजेक्शन

बर्फ किंवा भाकरी गरम करून त्याच्या गरम वाफेने ते शेकले जाते. कानात जास्तीचे रक्त जमा झाले तर ते इंजेक्शनने काढले जाते. पैलवानाचा कान बांधून ठेवला जातो. नंतर दोन-चार दिवसांत फुग सामान्य होते. पण त्याला मार लागलेला कान मात्र कठीण बनतो.

Wrestler Ear

सराव

बरेचदा कुस्तीमधील डावपेचांचा सराव करताना किंवा लढत देताना पैलवानाच्या कानाचा काही भाग मॅटला घासला जातो. अशावेळी देखील रक्त साकळून कान फुटतो किंवा सुजतो.

Wrestler Ear

सराव

विदेशात तर कुस्तीचा सराव करताना कानाला दुखापत होऊ नये म्हणून अनेक रेसलर कानाचे हेल्मेट/इयर गार्ड देखील वापरतात.

सुपारी

काही लोकांना वाटते की कानात सुपारी घालून कान पैलवानांचे फोडतात. पण अशा पद्धतीने कोणी कान फोडण्याचा प्रयत्न केला तर कानाला मोठी दुखापत होऊ शकते.

Wrestler Ear

फुलकोबीचे कान

दुखापत बरी झाल्यानंतर ती दुमडली जाऊन फुलकोबी सारखी दिसते. म्हणून त्याला 'फुलकोबीचे कान' अशीही संज्ञा आहे.

(माहिती स्त्रोत: Quora, Wrestlers Around the World Have Weird Ears, In Case You Ever Wondered, Here's Why Pehlwans Have Ears Like This)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wrestler Ear