Anuradha Vipat
मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख लक्ष्मीकांत बेर्डेंनी निर्माण केली होती.
पण १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांचे निधन झाले. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भाऊ, लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या निधनावर भाष्य केले आहे.
एका मुलाखतीमध्ये पुरुषोत्तम यांनी यांनी म्हटले की 'लक्ष्याने स्वत:ला संपवले. ज्यावेळी त्याला त्याच्या शरीराकडे लक्ष देण्याची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्याने ते केले नाही.
पुढे ते म्हणाले, 'लक्ष्याने लहानपणापासूनच कोणाचे ऐकले नाही. मी देखील त्याला कधी सांगू शकलो नाही, तू ह्या गोष्टींपासून लांब रहा.
लक्ष्याने कायम त्याला जे हवे तेच केले. त्यामुळे जर त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं. असं ते म्हणाले
ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत आहे की, एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करु शकलो नाही असंही पुरुषोत्तम यांनी यांनी म्हटले आहे