Anuradha Vipat
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले होते
आता या फोटोंवर नेटकऱ्यांकडून आलेल्या कमेंट्सबद्दल आलियाने नाराजी व्यक्त केली आहे.
संतापलेल्या आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.
आलियाचा बोटॉक्स चुकीचा झाला तसेच तिच्या चेहऱ्याच्या एका बाजूला पक्षाघात झाल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटल होतं
यावर पोस्टमध्ये आलियाने लिहिलं आहे की, जे लोक कॉस्मेटिक करेक्शन्स किंवा सर्जरी करतात, त्यांच्याबद्दल मी कोणतंच मत बनवत नाही
आलियाने लिहिलं आहे की, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून माझ्याबद्दल खोटे दावे केले जात आहेत , माझ्यासाठी हे सर्व हसण्याच्याही पलीकडचं आहे
तसेच पुढे आलियाने लिहिलं आहे की, यात सर्वांत दु:खदायक बाब माहितीये का? अशा प्रकारची अनेक मतं ही दुसऱ्या महिलांकडूनच मांडली जातात