आशुतोष मसगौंडे
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत, विविध देशांदरम्यान 24 जानेवारी 2025 पर्यंत कसोटी मालिका आयोजित केली जाईल. यानंतर गुणतालिकेत अव्वल असलेल्या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे.
फायनलची तारीख जाहीर झाली नसली तरी जूनमध्येच आयोजन करण्याचे नियोजन आहे. यावेळी WTC 2025 चा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळवला जाईल. यावेळी कोणते संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतात हे जाणून घेऊया.
आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 9 पैकी 6 सामने जिंकून 74 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी 12 पैकी 8 सामने जिंकून 90 गुण मिळवले आहेत.
न्यूझीलंड 6 पैकी 3 सामने जिंकून 36 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका 4 पैकी 2 सामने जिंकून 24 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान 5 पैकी 2 सामने जिंकून 22 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
भारतीय संघाला आणखी 10 सामने खेळायचे आहेत. ज्यामध्ये बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिका, न्यूझीलंडविरुद्धच्या 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांचा समावेश आहे.
भारताला WTC फायनलसाठी पात्र ठरायचे असेल तर 10 पैकी किमान 7 सामने जिंकावे लागतील.
ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर, 7 पैकी 4, दक्षिण आफ्रिका 8 पैकी 7, न्यूझीलंड 8 पैकी 6, पाकिस्तान 9 पैकी 7, इंग्लंड 9 पैकी 9, श्रीलंका 9 पैकी 6 सामने जिंकावे लागलीत.
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर येथे होणार आहे.