Sudesh
चिनी मोबाईल कंपनी श्याओमीने ऑटोमोबाईल क्षेत्रात उडी घेतली आहे.
श्याओमीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. बार्सिलोनामध्ये होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या कारची झलक पहायला मिळाली.
Xiaomi SU7 असं या गाडीचं नाव आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ही गाडी चीनमध्ये सादर करण्यात आली होती.
ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 800 किलोमीटर धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे.
Xiaomi SU7 यातील 'SU'चा अर्थ Speed Ultra असा आहे. या गाडीचा टॉप स्पीड 265 kmph एवढा आहे. बेस व्हेरियंटचा टॉप स्पीड 210kmph आहे.
या गाडीमध्ये क्रूज कंट्रोल, पार्किंग असिस्टंट, एंटरटेन्मेंट सिस्टीम, 25 स्पीकर सिस्टम, सेल्फ पार्किंग, HD कॅमेरा, अल्ट्रासॉनिक, रडार असे कित्येक अत्याधुनिक फीचर्स मिळतात.
या कारला कंपनीने दोन बॅटरी व्हेरियंटसोबत सादर केलं आहे. तसंच, यामध्ये तीन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.
या कारमध्ये 73.6 kwh बॅटरीपॅक देण्यात आलाय. टॉप व्हेरियंटमध्ये 101 kwh एवढी मोठी बॅटरी मिळते. कंपनीने यामध्ये CTB (Cell to Body) टेक्नोलॉजीचा वापर केल्याचं म्हटलं आहे.
या गाडीची लाँच डेट अद्याप कंपनीने जाहीर केली नाही. जेव्हा कारचं अधिकृत लाँचिंग होईल, तेव्हाच किंमत जाहीर करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.