Anuradha Vipat
मुंबईतील जुहूमध्ये रवीनाचे वडील रवी टंडन यांच्या नावाने एक चौक उभारण्यात आला आहे.
अशात रवीना आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या चौकाच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती.
१७ फेब्रुवारी रोजी रवी टंडन यांची जयंती होती. रवीनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या दिवंगत वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आदरांजली वाहिली आहे.
रवीना टंडनने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडन इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक होते.
एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या वाढदिवशी एका चौकाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.