हँडलशिवाय चालवता येते ही बाईक; यामाहाने केली सादर

Sudesh

यामाहा

जपानी बाईक कंपनी यामाहा ही आपल्या खास गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतातही या गाड्या लोकप्रिय आहेत.

Yamaha Motoroid 2 | eSakal

नवी बाईक

आता यामाहाने आपली एक नवी कन्सेप्ट बाईक लाँच केली आहे. विशेष म्हणजे या बाईकला हँडलच नाहीत.

Yamaha Motoroid 2 | eSakal

मोटोरॉईड

Yamaha Motoroid 2 असं या कन्सेप्ट बाईकचं नाव आहे. याचं डिझाईन अगदी एखाद्या सायन्स-फिक्शन मूव्हीमध्ये दिसणाऱ्या बाईक्सप्रमाणे आहे.

Yamaha Motoroid 2 | eSakal

टेक

ट्विस्टिंग स्विंगआर्म, एआय फेशिअल रेकग्नेशन, सेल्फ बॅलन्सिंग आणि जेश्चर कंट्रोल अशी टेक्नॉलॉजी यामध्ये वापरण्यात आली आहे.

Yamaha Motoroid 2 | eSakal

कंट्रोल

आपल्याला ज्या दिशेला वळायचं आहे, त्या दिशेला थोडंसं झुकून ही बाईक वळवता येऊ शकते.. तसंच हाताच्या इशाऱ्यांनी ही बाईक मागे-पुढे ढकलणे किंवा थांबवणे अशा क्रिया केल्या जाऊ शकतात.

Yamaha Motoroid 2 | eSakal

फेस रेकग्नेशन

या बाईकमध्ये असलेल्या फेशिअल रेकग्नेशन तंत्रज्ञानामुळे ही बाईक आपल्या मालकाला ओळखू शकते. मालकाचा चेहरा स्कॅन करताच यातील फीचर्स अ‍ॅक्टिव्हेट होतात.

Yamaha Motoroid 2 | eSakal

सेल्फ बॅलन्सिंग

सेल्फ बॅलन्सिंग टेक्नॉलॉजीमुळे ही बाईक आपोआप चालत आपल्या मालकाकडे येऊ शकते, तसंच तिला उभं करण्यासाठी स्टँडचीही गरज भासत नाही.

Yamaha Motoroid 2 | eSakal

कधी येणार?

ही एक कन्सेप्ट बाईक असून, ही खरोखरच लाँच केली जाईल का याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamaha Motoroid 2 | eSakal