आशुतोष मसगौंडे
आयपीएलच्या गेल्या हंगामात गुजरातसाठी यश दयाल व्हिलन ठरला होता. कारण त्याल्या केकेआर च्या रिंकू सिंगने सलग पाच बॉलवर पाच षट्कार मारले होते.
गेला हंगाम निराशाजनक गेल्यानंतर यशला गुजरातने करारमुक्त केले होते.
यंदाच्या हंगामासाठी यशवर विश्वास दाखवत आरसीबीने त्याला करारबद्ध केले. आणि त्याच्या कारकिर्दीचा नवा डाव सुरू झाला.
दरम्यान, काल चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात प्ले ऑफ गाठण्यासाठी काट्याची टक्कर झाली. यामध्ये आरसीबीने बाजी मारली.
या सामन्यात प्ले ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला शेवटच्या षटकात 17 धवांची गरज होती अन् चेंडू होता यश दयालच्या हाती.
स्ट्राइकवर असलेल्या धोनीने यशच्या पहिल्याच चेंडूवर मैदानाबाहेर षटकार मारला. पण त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने धोनीला बाद केले.
पुढच्या दोन चेंडूमध्ये फक्त 1 धाव देत यशने सामना आरसीबीच्या बाजून फिरवला. अन आरसीबीचे फ्ले ऑफचे तिकिट नक्की केले.
शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकल्यानर देशभरातील क्रीडा प्रेमींकडून यशच कौतुक होऊ लागले. अन् गेल्या हंगामात गुजरातसाठी व्हिलन ठरलेला यश आरसीबीसाठी हिरो ठरला.