Swadesh Ghanekar
रोहित शर्मा ( ६) , शुभमन गिल ( ०) व विराट कोहली ( ६) यांना हसन महमूदने पहिल्या माघारी पाठवले.
यशस्वी व ऋषभ पंत ( ३९) यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ चेंडूंत ६२ धावा जोडल्या.
यशस्वी जैस्वालने ११८ चेंडूंत ९ चौकारांसह ५६ धावांवर माघारी परतला.
आर अश्विनने घरचे मैदान गाजवले आणि जडेजासह आक्रमक फटकेबाजी केली आणि शतकी भागीदारी केली
घरच्या मैदानावर कसोटीच्या पहिल्या १० डावात ७५० हून अधिक धावा करणारा यशस्वी इतिहासातील पहिला फलंदाज ठरला.
वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हेडलींनी १९३५ मध्ये १० कसोटी डावांनंतर मायदेशात सर्वाधिक ७४७ धावा केल्या होत्या.
पहिल्या १० कसोटी सामन्यांत ८ अर्धशतकं यशस्वीच्या नावावर आहेत. त्याने विनोद कांबळी, विराट कोहली, अजित वाडेकर यांचा विक्रम मोडला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत यशस्वीने दुसरे स्थान पटकावले.
WTC 2023-25 मध्ये जो रूटने २९ इनिंग्जमध्ये १३९८ धावा केल्या आहेत, तर यशस्वीने १०८४ धावा केल्या आहेत.