यशस्वी जैस्वाल ठरतोय सिक्स हिटर! 'हा' कारनामा करणारा पहिलाच भारतीय

Pranali Kodre

भारताचा पराभव

भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने २६ ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ११३ धावांनी पराभूत केले. यासह मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

Yashasvi Jaiswal - Shubman Gill | Sakal

यशस्वी जैस्वालची झुंज

तरी या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत चांगली झुंज दिली होती. या दरम्यान, त्याने एक मोठा विक्रमही केला.

Yashasvi Jaiswal | Sakal

जैस्वालची खेळी

जैस्वालने भारताकडून दुसऱ्या डावात ६५ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले.

Yashasvi Jaiswal | Sakal

जैस्वालचे २०२४ मधील षटकार

जैस्वालने २०२४ वर्षात कसोटीमध्ये ३० षटकारांचा टप्पा पार केला. त्याने या वर्षात कसोटीमध्ये ३२ षटकार २६ ऑक्टोबरपर्यंत मारले आहेत.

Yashasvi Jaiswal | Sakal

विक्रम

कसोटीत तो एका वर्षात ३० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा भारताचा पहिलाच, तर जगातील दुसराच फलंदाज ठरला.

Yashasvi Jaiswal | Sakal

ब्रेंडन मॅक्युलम

त्याच्याशिवाय ब्रेंडन मॅक्युलमने २०१४ साली ३३ षटकार मारले होते.

Brendon McCullum | X/ICC

मॅक्युलमला मागे टाकण्याची संधी

त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्ध १ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीदरम्यान जैस्वाल मॅक्युलमच्या ३३ षटकारांच्या विक्रमालाही मागे टाकू शकतो.

Yashasvi Jaiswal | Sakal

बेन स्टोक्स

एका वर्षात कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मॅक्युलम आणि जैस्वाल यांच्यापाठोपाठ बेन स्टोक्स आहे. त्याने २०२२ मध्ये २६ षटकार मारले होते.

(Yashasvi Jaiswal first Indian cricketer to hit 30 sixes in Tests in calendar year)

Ben Stokes | Sakal

Virat Kohli ची 'कासव'गती! २०२० पासून धावांचा वेग मंदावला

Virat Kohli Test Cricket | Sakal
येथे क्लिक करा