पहिल्यांदाच योगा करताय? मग, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, सराव होईल सुलभ

Monika Lonkar –Kumbhar

योगा

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे योगा करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते

योगासोबतच संतुलित आहार घेणे देखील महत्वाचे आहे.

विशेष म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्ती योगाचा सराव करू शकतात. परंतु, योगा करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? जाणून घेऊयात.

रिकाम्या पोटी करा योगा

जर तुम्ही पहिल्यांदाच योगासनांचा सराव करणार असाल तर तुम्हाला हे माहित असायला हवे की, योगाचा सराव हा रिकाम्या पोटी करणे महत्वाचे असते.

वॉर्म अप करा

योगाचा सराव करण्यापूर्वी वॉर्म अप करावे. जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करत असाल तर थेट योगा मॅटवर बसून लगेच योगासन करू नका. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी सर्वात आधी वॉर्म अप करा. 

सैलसर कपडे

योगाचा सराव करताना आरामदायक कपडे परिधान करा. जेणेकरून तुम्ही योगाचा सराव व्यवस्थित करू शकता. घट्ट कपडे परिधान केल्याने शरीराच्या स्नायूंमध्ये ताण पडून कपडे फाटण्याची भीती असते. 

अवघड योगासने करू नका

पहिल्यांदाच योगा करताना करायला सोपी असणारी योगासने करा. अवघड योगासने लगेच करू नका.

मनुक्यात लपलाय आरोग्याचा खजिना, जाणून घ्या हे फायदे

Benefits of Manuka | esakal
येथे क्लिक करा.